लोणी (वार्ताहर ) : गणेश कुंभकर्ण
निपक्ष व निर्भीड दैनिक असलेल्या" दैनिक पुढारी ने प्रकाशित केलेला " दीपस्तंभ" दिवाळी अंक वाचनीय असल्याची प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हार भगवतीपुर येथील दैनिक पुढारीचे प्रतिनिधी प्रमोद कुंभकर्ण यांनी सौ. शालिनीताई विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना दैनिक पुढारी च्या "दीपस्तंभ" हा दिवाळी अंक भेट दिला. त्याप्रसंगी त्यांनी दिवाळी अंकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी सौ.अर्चना कुंभकर्ण यांनी सौ शालिनीताई विखे पाटील यांचा सत्क, र केला.पत्रकार प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण ,गणेश कुंभकर्ण ,भाऊसाहेब लोंढे ,विपुल गवांदे ,माळवदे आदी उपस्थित होते.
Post a Comment