कोल्हार प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण
लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पद्मश्री विखे पाटील कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोणी येथे मध्यवर्ती ग्रंथालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती माननीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची 91 वी जयंती समारंभ हा " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.जी रसाळ होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एस.व्ही लहारे ,उपप्राचार्य डॉक्टर ए.एस वाबळे ,प्रमुख व्याख्याते डॉ. एस एस अनर्थे ,ग्रंथालय समिती अध्यक्ष श्रीमती डॉ.लामखडे ,डॉ. एस.पी.गिरी ,ग्रंथपाल सौ.भोसले व महाविद्यालयातील प्राध्यापक ,प्राध्यापकेतर सेवक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती .
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.अनर्थे यांनी भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच उपप्राचार्य डॉ. आर.जी.रसाळ यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना
डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्याची व जीवनचरित्राची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांसाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन हे
राहाता महाविद्यालयाचे उपप्राचार्य
डॉ.एस व्ही लहारे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांच्या पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एन डी काळे यांनी तर अध्यक्षीय सूचना श्री आर.वाय शेळके यांनी मांडली बी.एस आहेर यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल के.एल.भोसले यांनी केले.
Post a Comment