कोल्हार प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण 

 लोकनेते, पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.अशोक बिडगर यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इतिहास विषयात एमफील व पीएचडी संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळालेली आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार व रिसर्च जर्नल मध्ये त्यांनी संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहेत. " महाराष्ट्रातील धनगर समाजाचा इतिहास " हे पुस्तक नुकतेच केरळचे महामहिम राज्यपाल यांचे हस्ते प्रकाशित केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजयदादा विखे पाटील, प्राचार्य डॉ.पी.एम दिघे ,संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ ,सहसचिव भारत घोगरे ,शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post