लोणी प्रतिनिधी-गणेश कुंभकर्ण
लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांना इतिहास विषयातील " डॉ शांतीलाल पुरवार यांचे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय: एक अभ्यास " या शोधविषयाच्या संशोधन कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने एम.फिल पदवी जाहीर करण्यात आलेली आहे.
ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव हे त्यांचे संशोधन केंद्र होते. त्यांना न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे इतिहास विभागप्रमुख डॉ.किसन अंबाडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण हे लोणी महाविद्यालयात इतिहास विभागात कार्यरत आहेत. त्यांचे गडकिल्ले, शिवकालीन इतिहास या विषयावर अनेक वृत्तपत्रातून व मासिकांमधून लेख प्रसिद्ध झाले आहेत पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे
" दगलबाज शिवाजी " याविषयावर ग्रंथ समालोचक वक्ता व ग्रंथ अन्वेषक म्हणून व्याख्याते आहेत. तसेच पत्रकार आहेत .
उल्लेखनीय पत्रकारिता आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री.अण्णासाहेब म्हस्के पाटील, मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री. भारत घोगरे, संस्थेचे डायरेक्टर एज्युकेशन तथा विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रदीप दिघे, उपप्राचार्य डॉ. आर. जी. रसाळ, इतिहास विभागप्रमुख डॉ. अशोक बिडगर, प्रा.संदीप राजभोज, डॉ.उत्तम पठारे, डॉ.लहू गायकवाड, प्रा.राजेंद्र महानवर यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment