कोल्हार ( वार्ताहर) : साईप्रसाद कुंभकर्ण 
 कोल्हार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गाळ्यात असलेल्या इंडिया नंबर 1बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला.परंतु रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या संभाजी कुसळकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे या पोलीस कर्मचाऱ्यांला पाहून व अंधाराचा फायदा घेत एटीएम फोडण्यासाठी आणलेले साहित्य तेथेच ठेवून तिथून पळ काढला पोलीस नाईक संभाजी कुसळकर यांनी या चोरट्यांचा पाठलाग केला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. हे अज्ञात चोरटे शस्त्रधारी असल्याचे कुसळकर यांनी सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांनी नऊ हजार पाचशे रुपये किमतीचे ऑक्सीजन गॅस सिलेंडर ,गॅस कटर गन व गॅस टाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे हे अज्ञात चोरटे अंधाराचा फायदा घेऊन कारमध्ये पळून गेले असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post