लोणी प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण
 पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात दिनांक 20 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबीर-221, रिपब्लिक डे कॅम्प साठी औरंगाबाद ग्रुप कॅडेटचे निवड शिबीर कमांडंट कर्नल पंकज साहणी (सेना मेडल) व डेप्युटी कॅम्प कमांडंट लेफ्टनंट कर्नल नरेन दास, कम्मांडिंग ऑफिसर, 57 महाराष्ट्र बटालियन, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक कॅम्प कमांडंट कर्नल पंकज साहणी (सेना मेडल) यांनी केले. शिबिरासाठी महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. यासोबत पुढील आठ दिवसांच्या प्रशिक्षणाचा सदुपयोग करून आयुष्यात मोठी उंची गाठण्यासाठी प्रेरीत केले. या आठ दिवसीय संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबीरामध्ये कवायत, ड्रिल व रायफल ड्रिल बरोबरच गार्ड ऑफ ऑनर, शस्त्र प्रशिक्षण, 0.22 रायफल ची माहिती, 5.56 मी.मी. इंसास रायफल ची माहिती, फील्ड सिग्नल, जजिंग डिस्टन्स, नकाशा वाचनामध्ये नकाशावर स्वतःचे स्थान शोधणे, नकाशाच्या आधारे ग्राउंडवर स्वतःचे स्थान शोधणे, नकाशातील सांकेतिक चिन्हे व खुणा, मॅप सेट करणे, लिक्विड प्रिझमॅटिक कंपास मार्क थर्ड अल्फा, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जी.पी.एस.) ची माहिती, प्रथमोपचार, मैदानी खेळ, राष्ट्रीय छात्र सेना संघटना, फायरिंग, राष्ट्रीय एकात्मता, आपत्ती व्यवस्थापन, भारतीय सैन्याची रँक आणि बॅच ची माहिती, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, आरोग्य आणि स्वच्छता इ. विविध विषयांवर सहभागी छात्रांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी कॅम्प डेप्युटी कमांडंट कर्नल यू.एस. कुशवाहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एनसीसी छात्रांनी देशाची सेवा करावी तसेच कोणत्याही परिस्थितीत सामाजिक जाणिवेचे भान ठेवून व्यक्तिमत्व विकास वाढीसाठी प्रयत्न कराव असे आवाहन करतानाच समाजात पसरणाऱ्या अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य मिळविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. सांस्कृतिक कार्यक्रमाने शिबिराची सांगता झाली. या वेळी अनेक तरुण छात्रांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणासोबतच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिबिरकाळात विविध सांस्कृतिक व क्रीडा, वादविवाद, पथनाट्य आदी विविध स्पर्धांही घेण्यात आल्या होत्या. या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना समारोप सोहळ्यात पारितोषिके व पदक देऊन गौरविण्यात आले. सैनिकी शिस्तीबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरात औरंगाबाद ग्रुप मधील सर्व 9 बटालियन मधील एकूण 450 कॅडेट्स, 10 एन.सी.सी. ऑफिसर, 17 पी.आय. स्टाफ, सहभागी झाले होते. कॅडेट ने सामाजिक, सामुदायिक व सांस्कृतिक विकासाचे प्रशिक्षण घेत अविरत देशसेवेचा निर्धार व्यक्त केला. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, (महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य) मा. खासदार डॉ. सुजायदादा विखे पाटील, मा. सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त सचिव मा. भारत पाटील घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.दिघे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी कॅम्प ॲडज्यूटंट लेफ्टनंट डॉ. राजेंद्र पवार, कॅप्टन डॉ. सुनील देवकर, कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे, लेफ्टनंट डॉ. सुभाष आगळे व वर्षा आहेर, टि.ओ. महेश कुळधरण व संतोष जाधव, सी.टि.ओ. प्रा. दशरथ खेमनर, प्रा. हर्षल खर्डे, रविंद्र नेद्रे व डी.आय. धनश्री निकम सह 57 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर नारायण ब्रह्मा, नेमिचंद घोडके, 17 जे.सी.ओ. व एन.सी.ओ. यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post