लोणी प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण 

 लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोणी येथे करियर गाईडन्स आणि स्पर्धा परीक्षा सेलच्या वतीने " स्पर्धा परीक्षा आणि करिअर गाईडन्स" हा कार्यक्रम दि.8 रोजी सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी लोणी पोलीस स्टेशनचे एपीआय श्री समाधान पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी त्याचा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धती, आत्मसात करावी लागते. करिअर करण्यासाठी नियोजन, प्रामाणिकपणा व कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशाचे शिखर गाठता येते व चारित्र्यसंवर्धन करणे ही सुद्धा यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे असे त्यांनी सांगितले. सायबर गुन्हे ,महिलावरील अत्याचार याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे एपीआय श्री समाधान पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम दिघे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत तयारी कशी करावी याबाबत प्रेरणादायी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.रसाळ हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी डॉ.डी एस रांधवणे, प्रा.एल एम.घोटेकर ,डॉ.गणेश देशमुख, प्रा.राकेश माळी ,प्रा.संदीप राजभोज ,प्रा.शैलेश नळे,डॉ.श्रीकांत सुसार,प्रा.मनीषा भुजबळ,प्रा.शीतल भालके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ.अशोक बिडकर यांनी केले आभार प्रदर्शन डॉ.शैलेश कवडे -देशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.संगीता वाकोळे व प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण यांनी केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

Post a Comment

Previous Post Next Post