कोल्हार : साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार :-

 शिक्षण विभाग पं.स.राहाता कार्यालय येथे शिक्षण विभाग आणि राहाता तालुका विज्ञान , गणित अध्यापक संघटना आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा ( शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान ,आव्हाने व शक्यता या विषयावर आधारीत वक्तृत्व व शैक्षणिक साहीत्य सादरीकरण) स्पर्धा पार पडली. याप्रसंगी पं स गटशिक्षणाधिकारी श्री राजेश पावसे यांनी शिक्षक व विद्यार्थी जे नवनवीन उपक्रम व प्रयोग साहित्याद्वारे जनजागृती करीत आहे सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि सहभागीना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास श्री दिलीप दहिफळे ,श्री सुनिल गायकवाड ,दत्ता क्षीरसागर , श्रीमती कवडे मॅडम ,श्री घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे परिक्षक श्री दिलीप कुलकर्णी सर आणि श्री सुनिल आढाव सर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राहाता तालुका विज्ञान अध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल लोखंडे सर यांनी केले . याप्रसंगी इतर माध्यमिक विद्यालयांचे विज्ञान ,गणित विषयांचे अध्यापक ,स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते , या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.साक्षी दत्तप्रसाद राहाणे (प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी खुर्द )हिने पटकावला, तर द्वितीय क्रमांक - कु.भालेराव तनुजा शरद (महात्मा गांधी माध्य कन्या विद्यालय प्रवरा नगर) हिने मिळवला, तृतीय क्रमांक - कु.गोरे श्रध्दा जितेंद्र (श्री गणेश विद्यालय गणेशनगर )हिने पटकावला या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री तुषार पगारे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन - माध्यशिक्षक संघाचे श्री.प्रमोद तोरणे सरांनी केले. या सर्वांचे मान्यवरांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील,खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील ,मा.जि प अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ,पं स सभापती सौ नंदाताई तांबे ,गटशिक्षणाधिकारी श्री राजेश पावसे ,लोकनेते पदमभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था शिक्षण संचालिका सौ.एल.बी.सरोदे मॅडम , श्री.नंदकिशोर दळे सर ,प्रवरा कन्या विद्या मंदिर प्राचार्या श्रीमती दिप्ती मॅडम ,पर्यवेक्षक श्री. बी. टी. वडीतके सर यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post