लोणी प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण
प्रवरेतील शैक्षणिक क्षेत्रातील काम आत्मनिर्भर भारतासाठी दिशादर्शक आहे. येथील विद्यार्थ्याना मिळणारे शिक्षण आणि संस्थेच्या उपक्रमातून भावी शास्त्रज्ञ येथे घडवून संशोधनास मोठी दिशा मिळले असे प्रतिपादन आय.सी.ए.आर पुणे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता आठवी ते पी. एचडी पर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासठी आझादी का अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पद्यश्री विखे पाटील महाविद्यालय,लोणी येथील प्रवरा सायन्स फियस्टा२०२२ च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सोमकुंवर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, संस्थेचे माजी विद्यार्थी आणि टाटा अँग्री प्रा. लीचे शास्त्रज्ञ डाँ.हेमंत वाबळे, संस्थेचे अतांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, राहाता महाविद्यालयाचे संचालक डॉ.महेश खर्डे, प्राचार्य डॉ. पी. एम. डोंगरे, डॉ. हरीभाऊ आहेर, डॉ. दिलीप घोलप, प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. अनिल वाबळे आदी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात प्रवरेने आपले वेगळेपण जपले आहे. हेच या कार्यक्रमातून सिद्ध होत आहे. असे डॉ. सोमकुंवर यांनी सांगून मुलांन काय शिक्षण पाहीजे. त्याच्या कल्पना शक्तीला आणि संशोधन वृत्तीला संधी दिली तर आदर्श विद्यार्थी घडू शकतो. देशाला आज संशोधकांची गरज आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आत्म निर्भर भारताचे स्वप्न बघत आहेत आणि हेच प्रवरेचं काम देशातील शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशा दर्शक ठरत आहे. समृद्ध शिक्षण, समृद्ध विद्यार्थी हाच आत्मनिर्भर भारत घडू शकतो. असे सांगून ज्ञान मिळवतं रहा विषयाचा सखोल अभ्यास करा आणि संशोधन करत रहा यश मिळले असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पद्मश्री विखे पाटील हे कमी शिकले पण विचार व्यापक होता हा आदर्श विद्यार्थ्यांनी घेऊन पुढे जावे असे सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी सांगून टाकाऊ पासून टिकावू, शेती तंत्रज्ञान, पाणी, ऊर्जा आणि दळणवळण यासाठी हे प्रदर्शन दिशादर्शक असून विद्यार्थानो संशोधन करा प्रवर परिवार आपल्या सोबत आहे. ज्ञान मिळवंत पुढे जा असेही सांगितले. माजी विद्यार्थी डॉ. हेमंत वाबळे यांनी प्रवरेत होणारी जडणघडण ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी महत्वपूर्ण ठरल्याचे सांगितले.
प्रास्ताविकामध्ये डॉ. प्रदिप दिघे यांनी या उपक्रमाची माहीती देऊन दोन दिवसीय या प्रवरा सायन्स फियस्टा २०२२ चा लाभ घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वैशाली मुरादे डॉ. कल्पना पलघडमल यांनी तर आभार डॉ. अनिल वाबळे यांनी मानले.
Post a Comment