कोल्हार : साईप्रसाद कुंभकर्ण
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शेळके यांचा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते नुकताच गौरव करून त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवून कोरोना काळात गोर गरीब घटकांना जीवनावश्यक वस्तू वितरण करून सहकार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमान सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण रामदास शेळके यांचा आडगाव बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
यावेळी आडगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच पूनमताई बर्डे, उपसरपंच अशोक लहामगे व खडके वाकेचे आदर्श सरपंच सचिन मुरादे ,विष्णू घोरपडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वसंतराव शेळके ,व्हा चेअरमन रामदास लहामगे व सर्व संचालक मंडळ प्रवरा शिक्षण संस्थेच्या लिलावती सरोदे ,प्रवरा बॅंकेच्या संचालक इलक ,स्कूल्स कमिटी प्रमुख कोंडीराम शेळके, मुख्याध्यापक आंधळे व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी तसेच गोरक्षनाथ देठे महाराज ,चंद्रकांत शेळके ,भीमराज शेळके ,सिताराम शेळके सुभाष शेळके ,सारंगधर शेळके, शिवाजी शेळके ,संजय शेळके ,सुनील बर्डे ,कौशाबाई राऊत व शालेय विद्यार्थी , ग्रामस्थ महिला व मान्यवर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment