कोल्हार वार्ताहर-(साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)
खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवाची उत्साहाच्या वातावरणात सांगता करण्यात आली श्रावण महिन्यात नागपंचमी च्या नंतर येणाऱ्या रविवारी हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो,
या उत्सव बद्दल माहिती देताना श्री दत्तात्रेय प्रभाकर कासार ( साक्रीकर) यांनी सांगितले की या उत्सवाच्या निमित्ताने दिवाळी सणा प्रमाणे घराघराला रंगरंगोटी केली जाते विविध रंगाच्या साड्या व पडद्याच्या साह्याने आकर्षक सजावट करून देवी करिता छत बनवले जाते. उत्सवाच्या प्रथम दिवशी एका चौरंगावर कानबाई व कन्हेर राजा यांची कुटुंब प्रमुखाकडून विधिवत पूजा करून कानबाई व कन्हेर राजाची प्रतिष्ठापना केली जाते नंतर महाआरती केली जाते नैवेद्य दाखवल्यानंतर कानबाई व कन्हेर राजाचा जयघोष केला जातो या उत्सवानिमित्त सासरी असलेल्या लेकीबाळी माहेरी येतात व सर्वजण एकत्र येऊन मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कानबाई व कनेर राजाची प्रतिमा प्रतिष्ठापित केलेल्या चौरंगावर चौरंग डोक्यावर घेऊन कानबाई व कनेर राजाची सवाद्य मिरवणूक काढली जाते व नदीकिनारी आणले जाते त्याठिकाणी विधिवत पूजा व महाआरती होऊन कानबाई व कनेर राजेची नदीच्या पाण्यात विसर्जन केले जाते व कानबाई साठी केलेला रोटा चे कुटुंबातील सदस्यांकडून सेवन केले जाते. यावर्षी दत्तात्रेय कासार यांच्या कडे हा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार प्रमोद कुंभकर्ण, सौ.अर्चना कुंभकर्ण साईप्रसाद कुंभकर्ण,गणेश कुंभकर्ण,साक्षी कासार,पद्मावती कासार सौ. मोहिनी कासार, शरद वडगावकर सौ.मनीषा वडगावकर साहिल वडगावकर विजय दोडे छाया दोडे,तुषार कोळपकर निकिता कोळपकर तेजस कासार आदी उपस्थित होते.
Post a Comment