स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हार येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघ व सुसंवाद मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी कोल्हार- बेलापूर रोडवरील श्री वर्धमान जैन स्थानकात सकाळी नऊ ते दोन या वेळेत मोफत नेत्र तपासणी दंतरोग चिकित्सा रक्तदान अस्ती रोग तपासणी शिबीर याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उद्योजक महेंद्रकुमार कुंकूलोळ व अभिनव कुंकूलोळ यांनी दिली.शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी सोबत आपले आधार कार्ड व घरचा फोन नंबर आणणे आवश्यक आहे तसेच चालू असलेली औषधे गोळ्या डॉक्टरांच्या रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे शिबिरात कॉम्प्युटरद्वारे मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे या मोफत रोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान उद्योजक महेंद्रकुमार कुंकूलोळ यांनी केले आहे.
Post a Comment