कोल्हार प्रतिनिधी :- साईप्रसाद कुंभकर्ण 


 शिंदे फडणवीस सरकारच्‍या मंत्रीमंडळात नामदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांना प्रथम क्रमांकाची शपथ घेण्याची संधी मिळाल्‍याने तालुक्यात व प्रवरा परिसरात फटाक्‍यांची आतषबाजी करत डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. नामदार विखे पाटील यांना मंत्रीमंडळात स्‍थान मिळणार ही अपेक्षा लोणी ग्रामस्‍थांसह संपूर्ण तालुक्‍याला होती. शपथविधीचा मुहूर्त निश्चित झाल्‍यानंतर नामदार विखे पाटील यांना कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्‍सुकता त्‍यांच्‍या समर्थक कार्यकर्त्‍यांसह जिल्‍ह्याला होती. शपथविधी सोहळ्यासाठी तालुक्यातुन मोठया प्रमाणात कार्यकर्ते मुंबईला गेले होते.शपथविधी सुरु झाल्‍यानंतर प्रथम क्रमांकांवरच नामदार विखे पाटील यांना शपथ घेण्‍याची संधी मिळाल्‍यानंतर कार्यकर्त्‍यांचा जल्‍लोष अधिकच व्दिगुणीत झाला. उपस्थित कार्यकर्त्‍यांनी विजयाच्‍या घोषणा देत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार विखे पाटील यांचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुंबईत शपथविधीच्या कार्यक्रमासाठी ना.विखे यांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते दिपक धावणे , संजय धावणे ,श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश तांबे ,उद्योजक निखिल जगताप , बापूसाहेब कांडेकर, शंकर तांबे ,प्रवरा कारखान्याचे संचालक देवीचंद तांबे, सुनील तांबे आदीसह प्रवरा परिसरातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. ना विखे यांच्या शपथविधी नंतर त्यांचा दीपक धावणे व योगेश तांबे तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .

Post a Comment

Previous Post Next Post