राहाता प्रतिनिधी :- (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)

 प्रेस क्लब प्रवराच्या अध्यक्षपदी विजय बोडखे (राजुरी) तर उपाध्यक्षपदी प्रमोद कुंभकर्ण (कोल्हार) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 मंगळवारी प्रेस क्लब प्रवरा या नुतन संघटनेची ही निवड जाहीर करण्यात आली असून ही निवड एका वर्षासाठी असून या संघटनेमध्ये सुभाष कोंडेकर यांची सचिव पदी (कोल्हार) तर प्रसिद्ध प्रमुख कोंडीराम नेहे (लोहगाव) कार्याध्यक्ष म्हणून संजय कोळसे (कोल्हार )खजिनदार पदी सुहास वैद्य (कोल्हार) ,निमंत्रक प्रवीण बेंद्रे (कोल्हार ) संघटनेचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के (लोणी) प्राध्यापक रवींद्र काकडे( लोणी) सिताराम चांडे (लोणी) गणेश आहेर (लोणी) संजय शिवलेकर (कोल्हार )प्रा.अनिल बेंद्रे( बाभळेश्वर) प्रकाश अवताडे (बाभळेश्वर) कैलास घोरपडे (निर्मळ पिंपरी) यमन पुलाटे (दुर्गापुर) विनोद पारखे (लोणी) साईप्रसाद कुंभकर्ण (कोल्हार )या व्यतिरिक्त सर्व ग्रुप वरील सन्माननीय जेष्ठ पत्रकार यांना सदस्य करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले असून या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार तसेच पत्रकारांसाठी कार्यशाळा, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post