कोल्हार वार्ताहर-(साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण) राहाता तालुक्यातील दाढ बु. येथे मागील दोन वर्षापासुन कोविड नियमांमुळे दर मंगळवारी होणारा आठवडे बाजार बंद होता. परंतु कोविडच्या ओसरत्या प्रभावामुळे ग्रामपंचायत दाढ बु.व समस्त ग्रामस्थांनी यांनी मिटींग घेऊन दररोज भरणारी मंडई बंद करुन २३ आॕगस्ट मंगळवार पासुन नियमित आठवडे बाजार सुरु राहील अशी माहीती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे तरी आठवडे बाजारातील फळे,भाजीपाला,किराणा,खाद्यपदार्थ दुकानदारांनी व दाढ व परिसरातील नागरीकांनी आठवडे बाजारात पुर्वत खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवावे असे आव्हान ग्रामपंचायत दाढ बु. व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post