कोल्हार वार्ताहर : (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण) कोल्हार येथे खर्डे वस्तीवर गेले एक ते दीड महिन्यापासून धुमाकूळ घालीत असलेला बिबट्याला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. याबाबत सविस्तर असे की कोल्हार- तिसगाव रस्त्यावरील खर्डे वस्तीवरील वसंत भगवंत खर्डे पाटील व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र अण्णासाहेब खर्डे पाटील यांच्या वस्ती वर गेले एक ते दीड महिन्यापासून बिबट्या धुमाकूळ घालीत होता या बिबट्याने या वस्तीवरील कुत्रे व शेळ्या यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे या वस्तीवरील रहिवाशी दहशतीखाली व जीव मुठीत घेऊन वावरत होते धनंजय अण्णासाहेब खर्डे यांना व या वस्ती वरील काही रहिवाशांनी रात्रीच्या वेळी या बिबट्याला वस्ती परिसरात वावरताना पाहिले होते.



 संचालक राजेंद्र अण्णासाहेब खर्डे यांनी वनविभागात या बिबट्या बाबत माहिती देऊन या परिसरात पिंजरा लावण्या बाबत सांगितले वन खात्यानेही तातडीने कार्यवाही करत राजेंद्र अण्णासाहेब खर्डे यांची गट नंबर 114 मध्ये असलेल्या शेतजमिनीत वीस दिवसापूर्वी पिंजरा लावला या पिंजऱ्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या अडकला. शेतमजूर धनंजय जामोद यांनी सकाळी ही माहिती राजेंद्र अण्णासाहेब खर्डे यांना दिली. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची वार्ता वार्‍यासारखी गावात पसरली आणि या बिबट्याला पाहण्यासाठी खर्डे वस्तीवर आबालवृद्धांनी एकच गर्दी केली. हा बिबट्या नर जातीचा असून सहा वर्षे वयाचा असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले हा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अजून एका बिबट्याचा वावर या परिसरात असल्याची माहिती धनंजय राजेंद्र खर्डे पाटील यांनी दिली कोल्हार भगवतीपुरला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव व वस्ती परिसरात असलेली दाट झाडी यामुळे या ठिकाणी बिबट्यांचा वावर नेहमीच असल्याचेही धनंजय राजेंद्र खर्डे पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post