कोल्हार :- साईप्रसाद कुंभकर्ण
लोणी - तळेगाव मार्गावरील लोहारे मिरपूर येथील श्रीहनुमान मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला असून गुरुवार (दि.18) रोजी सुमारे साडेचार फूट उंचीच्या आकर्षक व भव्य श्रीहनुमानाच्या तसेच प्रभू श्रीराम ,लक्ष्मण ,माता सीता यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे .या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास गुरुवार (दि.18) पासून प्रारंभ झाला.हा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार (दि.18) पासून रविवार (दि.21) असा असणार आहे.
या सोहळ्या अंतर्गत गुरुवारी श्री हनुमानासह बसविण्यात येणाऱ्या प्रभू श्रीराम ,लक्ष्मण ,सीता आदि मुर्तींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. हनुमान मंदिरापासून लोहारे मिरपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आवजीनाथ बाबा मंदिर, कालभैरव मंदिर अशी गावातून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी ठिकठिकाणी मूर्तीची पूजा केली मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.या मिरवणुकीनंतर हनुमान चालीसा पठण ,नाम जप सेवा तसेच ह.भ.प ऋषिकेश महाराज डेरे यांचे प्रवचन व ह.भ.प. राहुल महाराज पोकळे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. त्यानंतर हनुमान मूर्तीसाठी आर्थिक योगदान दिलेले उस्मान करीम सय्यद उर्फ कालू शेठ तसेच प्रवीण कार्ले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शुक्रवारी (दि.19) रोजी पहाटे काकड आरती तसेच सकाळी आठ वाजता हनुमान चालीसा ,नामजप नंतर आरती तसेच चार वाजता ह.भ.प रामभाऊ महाराज मुठे यांचे प्रवचन व 7 वासता ह. भ. प भास्कर महाराज पागिरे यांची कीर्तन सेवा होणार आहे.
शनिवार (दि.20 )रोजी हनुमान चालीसा, नामजप होणार असून चार वाजता ह.भ.प विठ्ठल महाराज दवंडे यांचे प्रवचन व 7 वा वासता ह.भ.प.दिपकनाथ महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे.
रविवार (दि.21) रोजी कालभैरव मठाचे मठाधिपती ह.भ.प त्र्यंबकेश्वराणंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते हनुमान व प्रभू श्रीराम ,लक्ष्मण ,सीता माता यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व काल्याचे कीर्तन होणार आहे. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणपत भोसले, निलेश कराळे ,नंदू आप्पा रणमाळे, विष्णू मामा आहेर ,शिवाजी पोकळे ,संजय रनमाळे ,गोकुळ रणमाळे ,दत्तात्रय पोकळे, बाळासाहेब पोकळे ,जालिंदर कापकर, भाऊसाहेब पोकळे,अण्णा सोमवंशी, दत्तू रणमाळे ,घनश्याम भारस्कर ,भोसले परिवार आदी प्रयत्नशील आहे.
Post a Comment