कोल्हार वार्ताहर-(साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना आजादी का अमृत महोत्सव आणि घरघर तिरंगा या अभियानांतर्गत प्रवरा हायस्कूल कोल्हार मध्ये विविध कार्यक्रमांनी आणि स्पर्धांनी सप्ताह साजरा करण्यात आला. पद्मश्री विखे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील जयंती पासून सुरु झालेला आजादी का अमृत महोत्सव सप्ताह आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी माजी सैनिकांच्या गौरव सोहळ्याने समाप्त झाला. सप्ताह साजरा करीत असताना विद्यार्थ्यांच्या पोस्टर मेकिंग ,राखी मेकिंग ,चित्रकला ,समूह गायन ,पथनाट्य, वकृत्व स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा सारख्या विविध स्पर्धा घेऊन त्याची पारितोषिक वितरण आज माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले.
दिनांक 13 ऑगस्ट रोजी भारत मातेची मिरवणुकी द्वारे प्रभात फेरी काढण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषा परिधान करून फेरीमध्ये सहभाग घेतला. पथनाट्याच्या द्वारे भगवती माता मंदिरासमोरील प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेबाबतचे विषय सादर केले. दिनांक 17 ऑगस्ट रोजी कोल्हार भगवतीपुर मधील सैन्य दलातील विविध कर्तव्य बजावलेल्या माजी सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. प्राचार्य सुधीर मोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सत्कार केला . श्री एल डी शेख यांनी सर्व माजी सैनिकांची ओळख करून दिली. माजी सैनिक श्री बाबासाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सैन्य दलातील विविध संधी आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना सचोटी , प्रामाणिकपणा, कष्ट घेण्याची वृत्ती जोपासल्यास आपणास देश सेवेची संधी विविध सैन्य दलामध्ये मिळू शकते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी या गुणांचा अंगीकार करावा असे आवाहन केले . विद्यार्थी दशेतच सैन्य दलाबद्दल माहिती करून घेतली आणि त्याप्रमाणे प्रयत्न केले तर विविध पदांवर संधी मिळू शकते .त्यासाठी आपल्या शारीरिक क्षमतांबरोबरच व्यक्तिमत्व विकास आणि सामान्य ज्ञान वृद्धी करणे आवश्यक आहे असे त्यानी आपल्या भाषनत सांगितले. श्री राजेंद्र लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना आजादी का अमृत महोत्सव निमित्त शुभेच्छा दिल्या . कार्यक्रम प्रसंगी सुभेदार राजेंद्र कानडे माजी सैनिक श्री सिताराम इल्ले श्री अन्वर शेख श्री बाबासाहेब येवले आणि श्री संदीप मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री गोविंद तांबे यांनी केले तर आभार सौ प्रिया कवेकर यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संजय कडू श्री संदीप आहेर सौ कविता दळे श्री प्रमोद काले, संदीपआहेर श्री कदीर शेख श्री संतोष शेंडे आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment