कोल्हार वार्ताहर (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हार येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघ व सुसंवाद मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी कोल्हार- बेलापूर रोडवरील श्री वर्धमान जैन स्थानकात सकाळी नऊ ते दोन या वेळेत मोफत नेत्र तपासणी दंतरोग चिकित्सा रक्तदान व अस्थी रोग शिबिर संपन्न झाले. या शिबिरात 46 व्यक्तींनी रक्तदान सहभाग नोंदवला 120 व्यक्तीने नेत्र तपासणी केली पन्नास जणांनी अस्थीरोग शिबिरात सहभाग नोंदवला तर चाळीस जणांनी दंतरोग तपासणी केली. शिबिरात कॉम्प्युटरद्वारे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली शिबिर यशस्वी करण्यासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदकुमार भटेवरा सुसंवाद मंचचे जितेंद्र खर्डे, महेंद्र कुंकूलोळ, अनिल पाटील खर्डे, डॉक्टर शशिकांत काळे,महेंद्र राका, अभिनव कुंकूलोळ,सौरभ राका मयूर राका सुशांत राका, स्वप्निल संघवी, निलेश शिंगवी, सौरभ शिंगवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post