राहाता वार्ताहर -(साईप्रसाद कुंभकर्ण) 

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राऊतवस्ती येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार साहेब यांचे सेवक राजेंद्र खंडीझोड आणि सामजिक युवा कार्यकर्ते यांनी स्वखर्चाने राऊत वस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य,फळे, खाऊ, वह्या, खेळाचे साहित्य भेट देऊन मुलांसोबत आमदार राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसाचा केक कापून साजरा केल्याने शाळेचा पहिला दिवस मुलांचा आनंद द्विगुणित झाला.या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर भुसाळ, सदस्य दत्तात्रय निर्मळ, अशोक घोरपडे, वाल्मीक निर्मळ, आणि सर्व व्यवस्थापन समिती सदस्य , राजेंद्र विधाते आणि शिक्षक सुहास पवार यांनी सर्व मुलांना शाळेतले प्रसन्न वातावरणात नवागत मुलांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खंडीझोड यांनी राऊत वस्ती शाळेतल्या उत्तम परिसर,सुशोभन उपक्रम पाहून साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांचा कर्तुत्व गौरव भेट म्हणून शाळेसाठी सुद्धा दोन सीलिंग फॅन सप्रेम भेट देऊन साहेबांच्या बद्दल कृतज्ञतापूर्ण गौरव उद्गार व्यक्त केले.तसेच या प्रसंगी शासकीय योजना अंतर्गत मुलांना मोफत पाठ्यपुस्तके,मोफत गणवेश वाटप करण्यात आले. शाळेतील उपक्रमशील शिक्षक सुहास पवार आणि मुख्यध्यापक राजेंद्र विधाते यांनी शासकीय योजना,शालेय उपक्रम यांची माहिती दिली.यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व पाहुण्यांनी आमदार साहेब यांना उदंड निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा व प्रार्थना व्यक्त करून हा दिवस दुग्धशर्करा योगच म्हणून आनंददिन आहे असे विचार व्यक्त केले. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रभाकर भुसाळ,आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निर्मळ, अशोक घोरपडे आणि वाल्मीक निर्मळ , दानशूर व्यक्ती श्री राजेंद्र खंडीझोड आणि युवा सामाजिक कार्यकर्ते भावेश ब्राह्मणे,आतिश गायकवाड,सागर पाळंदे,रेव्ह विलास ब्राह्मणे आकाश पारधे,आदी उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पवार तर आभार प्रदर्शन राजेंद्र विधाते यांनी केले.या वेळी परिसरातील सर्व पालक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post