कोल्हार प्रतिनिधी- (प्रमोद कुंभकर्ण) 

 कोल्हार येथील स्वर्गीय माधवराव खर्डे पाटील चौकात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी चे एक झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही याबाबत सविस्तर असे की स्वर्गीय माधवराव खर्डे पाटील चौकातील श्री बाबासाहेब रामचंद्र खर्डे यांच्या दुकानासमोर असलेले तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी चे झाड आज सायंकाळी कोणतेही वादळ वादळ वारा नसताना अचानक कोसळले. पोकळ झाल्यामुळे हे झाड अचानक पडले असल्याचे व्यापारी सांगत होते या चौकात अनेक व्यापाऱ्यांच्या दुकाना आहे त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ असते परंतु हे झाड कोसळले तेव्हा त्या ठिकाणी कोणीही नव्हते त्यामुळे मोठी जीवितहानी टळली या दुकानाच्या शेजारी असलेल्या बाळासाहेब भणगे व महेंद्र राका यांच्या दुकानाचे हे झाड कोसळल्याने आर्थिक नुकसान झाले तर आप्पा कोळपकर यांच्या दुकानाची सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही दुर्घटनेतून बचावले घटनेनंतर कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी शशिकांत चौरे तसेच गोरक्ष खर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली महावितरणचे कर्मचारी डी एन कोळी, एस. एम. गोसावी, निखिल बारहाते व एन.जी ताठे यांनी तातडीने खंडित झालेल्या विद्युत पुरवठा सुरळीत केला हे अर्धवट पडलेले पोकळ झाड तातडीने काढावे व भविष्यातील दुर्घटना टाळावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post