सात्रळ वार्ताहर- (साईप्रसाद कुंभकर्ण) 
 रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता. राहुरी यांच्या विद्यमाने विद्यालयात इ.५ वी आणि ६ ते १० वी अखेर नवगत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मिठाई देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव कडू पाटील व प्रमुख पाहुणे किशोर शेठ भांड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. पी.बी पाटील यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून पुष्पंजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव कडू पाटील होते तर प्रमुख पाहुणे किशोर शेठ भांड तसेच पत्रकार अनिल वाकचौरे, पत्रकार हारदे मॅडम, प्रभारी प्राचार्य सिताराम बिडगर, प्रभारी पर्यवेक्षक सिराज मन्सूरी तसेच पालक,सेवक वृंद, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले यांनी केले तर आभार सिराज मन्सुरी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कलाशिक्षक सतीश नालकर, विलास गभाले,इ.५.वी वर्गशिक्षक गीतांजली गोसावी, देविदास थोरात, ग्रंथपाल मंदा पैरसय्या तसेच केशव मुसमाडे, सच्चिदानंद झावरे,भारत कोहकडे, युनूस पठाण, अरुण वाघ, संजय दिघे, वैभव वसावे, प्रकाश कुलथे, शिवदास सातपुते,त्रिंबक राशिनकर, सुनिता ढोकणे,पल्लवी गावडे, प्रविणाताई दिघे, प्रांजली फरकाडे, संजय शेलार ,प्रमिला बनगये, जालिंदर बनगये, रत्नाकर सोनवणे, रामदास साबळे, ज्ञानदेव माळी, राजू पेटारे आदींनी परिश्रम घेतले

Post a Comment

Previous Post Next Post