कोल्हार (वार्ताहर )-
प्रवरा शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यालयातील माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक ऊर्फ दादासाहेब पाटील धावणेयांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून व वृक्षारोपण करून प्रवरा परिसराचे भाग्यविधाते माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील सरपंच श्रीमती कल्पना मैड लोणी बुद्रुक ते उपसरपंच गणेश विखे-पाटील संस्थेच्या संचालिका सरोदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव धावणे पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक निर्मळ सिंधुताई म्हस्के सुनिता चव्हाण संतोष विखे एन.डी.विखे बाबूलाल कटारिया सोपान विखे माजी सरपंच लक्ष्मणराव बनसोडे लोणी बुद्रुक सोसायटीचे चेअरमन अशोक धावणे आदीसह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या सामाजिक कार्यकर्ते दीपक धावणे यांनी आमदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर उभे राहावे व विद्यालयाचे व कुटुंबाचे नावलौकिक वाढवावे असे सांगितले विद्यालयाचे माजी विद्यार्थी मयूर विखे पाटील यांनी माजी मंत्री आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त 63 किलो ग्रॅम वजनाचा केक कापून विखे पाटील यांचा वाढदिवस साजरा केला लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयात नव्यानेच बसवलेल्या जिमचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक धावणे पाटील यांनी केले.
Post a Comment