महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. एका स्त्रीची प्रचंड इच्छाशक्ती, युद्धनीती, दानशूरवृत्ती ‘पुण्यश्लोक’ या उपाधीस पात्र ठरली. असे विचार प्रा.कैलास चिंधे यांनी व्यक्त केले
कोल्हार येथील शिवाजीनगर उपनगरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रा.बिडकर ,विठ्ठल बेंद्रे गुरुजी ,राजेश रोडे,
डॉ श्रीकांत बेंद्रे ,सोनवणे सर ,पत्रकार साईप्रसाद कुंभकर्ण ,सचिन बुचडे, राजेंद्र दातीर एकनाथ येवले ,देशपांडे मॅडम आदी उपस्थित होते.
प्रथमतः उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रा.बिडकर डॉ .श्रीकांत बेंद्रे ,सौ.अर्चना कुंभकर्ण ,
सौ श्रावणी बेंद्रे यांनी आपल्या भाषणातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री जालिंदर रोडे सौ राजश्री बुचडे यांनी केले.डॉ श्रीकांत बेंद्रे यांनी आभार मानले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश रोडे ,जगन्नाथ मिजगुले ,रावण काकडे ,गोरख वाल्हेकर ,कचेश्वर टेकडे ,संतोष चिखले, दत्ता राजभोज ,शाकिर शेख ,तसेच लता रोडे ,राजश्री बुचुडे ,नयना रोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment