कोल्हार : साईप्रसाद कुंभकर्ण
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे मागिल महिन्यात दिनांक २८/५/२०२२ रोजी जालिंदर विखे यांच्या गट नंबर ३०८ मध्ये ऊस तोड चालु असताना बिबट्याचे पिल्लु सापडले. विखे यांनी तात्काळ प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच म्हस्के हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व पिल्लाचे निरीक्षण केले असता शेपटीला जखम झालेली दिसली. म्हस्के यांनी लगेच नगरच्या उपवनसंरक्षक अधिकारी सौ सुवर्णा माने, सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी रमेश देवखिळे, कोपरगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील, वनपाल गाढे यांना माहिती दिली. त्यानंतर लोणीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीकांत घोरपडे यांनी येवुन जखमी बिबट्याच्या पिल्लाचे औषधोपचार केले.
त्या दिवसापासून पिल्लाला जेथे सापडले त्या जागेवर रोज संध्याकाळी ठेवले जात असे परंतु त्या पिल्लाची आई पिल्लाकडे आली नाही. पिल्लाला डॉ. श्रीकांत घोरपडे दररोज येवुन मलमपट्टी करत होते. त्या पिल्लाचा प्राणीमित्र विकास म्हस्के,प्रमोद विखे, सौ अश्विनी विखे यांनी सांभाळ केला व परंतु त्याची ११ दिवस झाले तरी त्या पिल्लाची आई येत नसल्याने शेवटी वनपरीक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील यांनी ते पिल्लू पुढील संगोपनासाठी ताब्यात घेतले.
याकामी लोणी ग्रा.स.प्रविन विखे, प्रकाश दिघे, बद्री विखे, नाना धावणे यांनी विशेष सहकार्य केले.
Post a Comment