कोल्हार (वार्ताहर) : साईप्रसाद कुंभकर्ण 
 मोटार सायकल इलेक्ट्रिक पोलच्या कठड्या वर आदळून झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना प्रवरानगर येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की प्रवरानगर येथे एका वरातीत सहभागी होण्यासाठी लोणी येथील कार्तिक प्रकाश तुपे व सिद्धार्थ कोकणे हे दोघे हिरो होंडा स्प्लेंडर या मोटरसायकलवर आले होते होते वरातीचा कार्यक्रम आटपून ते हिरो होंडा स्प्लेंडर या आपल्या मोटरसायकलवरून भरधाव वेगाने जात असताना मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने स्प्लेंडर गाडी प्रवरा नगर येथील पंचवटी नजीक असलेल्या इलेक्ट्रिक पॉलच्या कठड्यावर जाऊन धडकली ही धडक इतकी जोरात होती की इलेक्ट्रिक पोलचा भक्कम कठडा तुटला व मोटर सायकलचे प्रचंड नुकसान झाले. हे युवक गंभीर जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडले होते लोणी पोलीस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्यानी या जखमी अवस्थेतील युवकांना लोणी येथील पीएमटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले या दोन्ही युवकांवर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत पोलीस कर्मचाऱ्यांनी या युवकांना मदत करून देखील लोणी पोलिस स्टेशनला मात्र या अपघाताबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही ही आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post