कोल्हार  प्रतिनिधी: ( गणेश कुंभकर्ण ) 
 स्पर्धा परीक्षा काळाची गरज असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य प्रशासनाच्या विविध सरळसेवा भरती, तसेच विविध स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये आपण सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त प्रामाणिकपणा ठेवून आपण आपल्या यशाकडे वाटचाल केली पाहिजे तसेच आपण ग्रामीण भागातील आहोत. असा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात न ठेवता छोट्या परीक्षांमधून आपले यश निर्माण करावे असे मार्गदर्शन अपर उपआयुक्त सौ.लता शिरसाठ यांनी विद्यार्थांना केले लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभाग आयोजित एम.ए.भाग -०२ इतिहास निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी अपर उपआयुक्त सौ.लता शिरसाठ यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले .यावेळी प्रमुख अतिथी अपर उपआयुक्त सौ.लता शिरसाठ (गुप्तचर वार्ता विभाग मुंबई) यांची उपस्थिती होती.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम दिघे, त्याचबरोबर इतिहास विभाग प्रमुख डॉ.ए. डी बिडगर पी.जी. इन्चार्ज प्रा. एस.बी राजभोज तसेच इतिहास विभागाचे माजी विद्यार्थी पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते श्री.साईप्रसाद कुंभकर्ण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. वनस्पतीशास्त्र विभागातील माजी विद्यार्थिनी अपर उपाआयुक्त सौ. लता शिरसाठ यांनी स्पर्धा परीक्षा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर इतिहास विभागाचे माजी विद्यार्थी पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते श्री.साईप्रसाद कुंभकर्ण , यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतिहास विषयातील वेगवेगळ्या संधी व भविष्यातील वाटचाल या विषयावर सविस्तर सखोल मार्गदर्शन केले इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना फक्त भूतकाळात घडून गेलेल्या घडामोडींचा अभ्यास न करता आपण पुढे पुरातत्वशास्त्र त्याचबरोबर पर्यटन शास्त्र तसेच इतिहास विषयाचा इतर विषयांशी असलेला सहसंबंध व उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून इतिहास विषयाच्या भविष्यातील रोजगार संधी त्याचबरोबर पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार यशस्वी व्हावे व समाजामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटावा जेणेकरून महाविद्यालयाच्या नावलौकिक मध्ये अधिकच भर पडेल असे आवाहन श्री साईप्रसाद कुंभकर्ण यांनी विद्यार्थ्यांना केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.बी राजभोज यांनी केले तसेच डॉ.ए.डी बिडगर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व सेवक वृंद व विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post