जळगांव प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण

 पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी दिं.२० में पशुसंवर्धन दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या पशुवैद्यकांना सन्मानित करण्यात येते. पुरस्कार निवडीसाठी 21 बाबनिहाय निकष, उद्दिष्टपूर्तीसह, गुणांकानाद्वारे जिल्हा व विभाग स्तरावरून शिफारस आयुक्तालयात केली जाते. त्यामध्ये पशुसंवर्धन विषयक गत पाच वर्षाचे तांत्रिक काम, योजनांची अंमलबजावणी, अभिलेखे, नस्त्यांची अद्ययावतता, प्रसार माध्यमे व इतर लेखन प्रसिद्धी, यशोगाथा व लोकाभिमुख राबविलेले विविध उपक्रम, संख्यात्मक व गुणात्मक कामकाज आणि केलेल्या उल्लेखनीय कामकाजाच्या निकषावर, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील डॉ.चंद्रकांत शंकरराव हलगे यांना, "सहाय्यक पशुधन विकास अधिकारी" संवर्गातून सन 2019--20 साठीचा राज्यस्तरीय "गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार" दिं. २० में रोजी सभागृह जिल्हा परिषद सभागृह, पुणे येथे मा.ना. सुनील केदार पशुसंवर्धन मंत्री,मा.सचिंद्र सिंह आयुक्त पशुसंवर्धन, डॉ परकाळे, अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त,यांच्या हस्ते प्रशिस्त पत्र व स्मृतिचिन्ह द्वारे गौरविण्यात आले.त्याप्रसंगी त्यांच्या समवेत त्यांची सुकन्या कु.रश्मी हलगे , सहाय्यक रचनाकार अधिकारी श्रेणी 1, वाशिम या होत्या. डॉ.हलगे यांनी अंतुर्ली ता मुक्ताईनगर ,पातोंडा ता.चाळीसगांव, जामनेर,यावर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कामकाज केलेले आहे. तसेच डॉ. हलगे यांना यापूर्वी विभागीय स्तरावरील आदर्श पशुवैद्यक पुरस्कार मिळाला आहे ते पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जळगाव माजी जिल्हा अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते व कासार समाज संघटनेत तसेच विविध संस्था संघटनांच्या जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत. त्यांच्या ह्या पुरस्कार प्राप्ति बद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post