कोल्हार : (साईप्रसाद कुंभकर्ण )
राहाता तालुक्यातील लोणी येथे नाशिक पुलाजवळ इरिगेशन बंगल्याजवळ संजय गंगाधर आहेर यांच्या गट नंबर ० मध्ये रविवार दि.८/५/२०२२रोजी दोन बिबट्याचे पिल्ले सापडले.
संजय आहेर यांच्या ऊसाची तोड चालु आहे आणि आज रविवारी पहाटे ऊस तोड कामगार ऊसतोडणी साठी आले असता त्यांना बिबट्याचे दोन पिल्ले सापडले घाबरून त्यांनी ऊसतोड बंद केली. लगेच ऋषिकेश आहेर याने प्राणीमित्र विकास म्हस्के यांना फोन करून माहिती दिली. म्हस्के हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व बिबट्याच्या पिल्लांना क्रेट मध्ये घेऊन सुरक्षीत ठिकाणी ठेवले. व ऊसतोड कामगारांना भेटुन त्यांची भिती दुर करत ऊसतोडणी सुरू केली.
प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी नगरच्या उपवनसंरक्षक अधिकारी सौ सुवर्णा माने मॅडम, कोपरगावच्या वनपरीक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील मॅडम, वनपाल बी. एस. गाढे यांना माहिती दिली.
संध्याकाळी डॉ. सुनिल आहेर, गिरीष आहेर, ऋषिकेश आहेर, संजय आहेर, प्रकाश दिघे, नाना धावणे, प्रविन विखे यांच्या मदतीने प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी पिल्लांना सापडले त्या जागेवर सोडण्यात आले .
आणि आजच्या मातृदिनी पिल्लांची आणि आईची भेट घडवुन आणली.
Post a Comment