कोल्हार प्रतिनिधी : ( साईप्रसाद कुंभकर्ण )
लोणी येथील पोलीस हेडकॉटर शेजारी गुजरात येथील अंदाजे तीस ते 32 वर्षी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे मृतदेहाची ओळख पटली असून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की दिनांक 17 मे रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास पोलीस हेडकॉटर च्या शेजारी व लोणी कोल्हार रोडच्या कडेला एका तीस ते 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला स्थानिकांनी या घटनेबाबत ची माहिती लोणी पोलीस स्टेशनला कळवली यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपत जायभाई व शरद पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली यावेळी मयत व्यक्तीची चौकशी केली असता हरिदास सवाजी चौधरी राहणार कपराडा गुजरात असे मयत व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती त्याच्या परिवारासह लोणी येथील गणेश देवराम दिघे यांच्या इथे दोन दिवसापूर्वी कामासाठी आले होते अशी माहिती मयताचे जावई व लोणी येथील गणेश दिघे यांनी दिली सदर व्यक्तीचा मृतदेह प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या घटनेबाबत अधिक तपास लोणी पोलीस करत आहे.
Post a Comment