कोल्हार :- (साईप्रसाद कुंभकर्ण )
राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे कोल्हार- राजुरी रस्त्यावर बनकर फाटा येथे फिरदोस आलमभाई पठाण यांच्या गट नंबर ३७९मध्ये रविवार दि.८/५/२०२२रोजी पहाटे बिबट्याचे ८मेंढ्या ठार करून एक मेंढी घेऊन पसार झाला. सकाळी फिरदोसभाई गोठ्यावर आले असता त्यांना मेंढ्या मृत अवस्थेत दिसल्या. त्यांनी लगेच विकास म्हस्के यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के घटनास्थळी पोहोचले व नगरचे उपवनसंरक्षक अधिकारी सौ सुवर्णा माने मॅडम, कोपरगावचे वनपरीक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील मॅडम, वनपाल बी.एस.गाढे यांना माहिती दिली. तातडीने गाढे व साखरे घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच कोल्हारचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. खपके यांनी मृत मेंढ्यांची उत्तरीय तपासणी केली. स्थानिक शेतकरी भयभीत झाले असून तातडीने पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
Post a Comment