लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात मोडी लिपी प्रारंभिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष मा. आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील , खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून मोडी लिपी प्रारंभिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे सोमवार दिनांक २५ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत कार्यशाळा संपन्न होणार आहेत .या कार्यशाळेसाठी पुणे येथील मोडी लिपी तज्ञ प्रा. महेश जोशी सर मार्गदर्शन करणार आहेत तरी प्रशिक्षण कार्यशाळेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नागरिकांनी व इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे इतिहास विभागातील समन्वयक प्रा. एस.बी राजभोज व डॉ. अशोक बिडगर यांनी केले आहे
Post a Comment