कोल्हार दि.२० प्रतिनिधी (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हारच्या प्रवरा हायस्कुल मध्ये दिनांक १८ एप्रिल पासून उन्हाळी शिबिर सुरु झाले.या शिबिरामध्ये कोल्हार परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .नुकत्याच संपलेल्या वार्षिक परीक्षा आणि वाढत चाललेले उन्हाचे तापमान अशा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कामात व्यस्त ठेवणे आवश्यक वाटल्याने शाळेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांना मोबाईलच्या लागलेल्या सवयीमुळे शरीरावर ,डोळ्यावर, मनावर होत चाललेले परिणाम दुर्लक्षून चालणार नाही. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे ही पालकांची प्राथमिक समस्या आहे. त्याचप्रमाणे मोकळ्या वेळामध्ये त्यांना काम देणे गरजेचे आहे.सुट्टीच्या फावल्या वेळाचा उपयोग व्हावा आणि नवनवीन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून दिले आहेत .
दररोज योगा प्राणायाम याच्या माध्यमातून सुरुवात होते त्यानंतर जलतरण, घोडे स्वारी ,नेमबाजी, रायफल शूटिंग चे प्रशिक्षण लोणी येथील सैनिक स्कूलमध्ये दिले जाते .विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावे त्यांना कष्टाची जाणीव व्हावी म्हणून वर्ग स्वच्छता करणे, आपला जेवणाचा डबा आपणच स्वच्छ करणे ,बूट पॉलिश करणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. कलाकुसरीचे काम त्यांना यावेत म्हणून ओरिगामी, चित्रकला ,ग्लास पेंटिंग, स्केच, सुंदर हस्ताक्षर ,कागदी वस्तू बनविणे ,मातीचे गणपती बनवणे, साच्याचा वापर करून वस्तू बनविणे ,शोभेच्या वस्तू तयार करणे, इंडोर गेम्स ,स्पोकन इंग्लिश, आरोग्य विषयक ज्ञान ,प्रश्नमंजुषा,आग विना पदार्थ बनविणे ,केक बनविणे , डान्स ,म्युझिक, नाटिका सादरीकरण, भाषण कौशल्य इत्यादी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थी मोबाईल पासून दूर गेल्याने आणि जास्तीत जास्त वेळ शाळेमध्ये व्यतीत करत असल्याने त्यांची सुट्टी कारनीलागत आहे.
विद्यार्थी विविध कौशल्य आत्मसात करीत असल्याने आणि वेळेचा सदुपयोग उपयोग झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी केले असून शिबिर यशस्वी होण्यासाठी सौ उल्का आहेर , कदीर शेख, शेंडे ,सुप्रिया तांबे , दिपक ढोणे आदींनी विशेष परिश्रम घेत आहेत.
Post a Comment