कोल्हार (वार्ताहर) : साईप्रसाद कुंभकर्ण
नगर-मनमाड राज्यमार्गावर प्रवरा नदीवरील गेली पस्तीस वर्षापासून कार्यरत असलेला जुना समांतर पूल आज पाडण्यास सुरुवात करण्यात आली.प्रवरा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल पाडल्यानंतर हा जुना पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता परंतु सततच्या वाढत्या अवजड वाहतूकीमुळे या पुलाला धोका निर्माण झाला होता व वारंवार या पुलाची डागडुजी करावी लागत होती त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती
वाढती अवजड वाहतूक व वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून या पुलाशेजारीच नवीन समांतर पूल बांधण्यात आला होता दहा अकरा वर्षापूर्वी हा समांतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला या नवीन समांतर पुलावरून व आज पाडण्यात आलेल्या जुन्या पुलावरून वाहनांची नगर व शिर्डी कडे वाहतूक सुरू होती त्यामुळे वाहतुकीसाठी जुना व नवीन असे दोन पूल सुरू होते
परंतु जुन्या पुलावरून जड वाहनांची वाहतूक बंद करून हा पूल फक्त दुचाकी वाहनांसाठी वाहतुकीस सुरू होता व नवीन समांतर पुलावरून जड वाहनासह इतर वाहनांची ये-जा सुरू होती तसेच जुना पूलवाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याने आज हा जुना पूल पाढण्यास सुरुवात केली असल्याची माहिती नगर-मनमाड राज्य मार्गाचे प्रकल्प अधिकारी राजाराम येवले यांनी सांगितले.
या पुलाच्या जागेवर आता नवीन पुलाचे बांधकाम सुरू होणार असून दीड ते दोन वर्षात या नवीन पुलाची उभारणी करण्यात येईल असे येवले यांनी सांगितले दरम्यान सध्या वाहतुकीसाठी नवीन समांतर पूल सुरू राहणार असून या समांतर पुलाचे ऑडिट झाले आहे व हा पूल वाहतुकीसाठी सक्षम सुरक्षित असल्याचे येवले यांनी सांगितले
दरम्यान आज सकाळी जुना पूल पाडण्यास सुरुवात झाल्यानंतर जुना पूल पडल्याची अफवांना गावात उधाण आले ही अफवा वार्यासारखी इतरत्र पसरली आणि पूल पडला नाहीतर पाडण्यात आला ही माहिती मिळाल्यानंतर मात्र अफवांना पूर्णविराम मिळाला.
Post a Comment