कोल्हार वार्ताहर -(गणेश कुंभकर्ण)
 राहुरी पंचायत समिती यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम काल राहुरी येथे संपन्न झाला. यावेळी राहुरी तालुक्यातील चिंचोली गावातील भटारकर वस्ती शाळेतील शिक्षिका श्रीम. मिनाक्षी श्रावण पाळंदे यांना राहुरी नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई तनपुरे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे, पंचायत समितीच्या सभापती सौ. बेबीताई सोडनर,उपसभापती प्रदीप पवार,माजी सभापती सौ.मनिषाताई ओहोळ,गटविकास अधिकारी गोविंद खामकर , भटारकर वस्ती शाळेचे केंद्रप्रमुख श्रीम.ठोंबरे व जि.प.सदस्य तसेच प.स.सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post