कोल्हार प्रतिनिधी: (साईप्रसाद कुंभकर्ण )
दारूच्या व्यसनापायी अनेक संसार उद्ध्वस्त झाले आजही अनेक स्त्रिया व्यसनी नवऱ्याबरोबर केवळ बापाची इज्जत जाऊ नये म्हणून संसार करताहेत बापाच्या डोळ्याला पाणी येऊ नये म्हणून नवऱ्याचा जाच सहन करताहेत परंतु व्यसनापायी बापाच्या खांद्यावर मुलाला जावे लागते तसेच माणसे धर्म सोडून वागतात कीर्तनकार मात्र त्यांना जागे करण्याचे काम करतात पण खरं बोलण्याचा त्रास आम्हाला होतो असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह. भ. प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले
कोल्हार येथे महाशिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी भगवती देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे, देवालय ट्रस्टचे विश्वस्त श्रीकांत खर्डे ,नंदूमामा खांदे, ,प्रकाश रावसाहेब खर्डे, प्रभाकर खर्डे,राजेंद्र कडस्कर विखे पाटील कारखान्याचे संचालक धनंजय दळे, तसेच रावसाहेब कमळाजी खर्डे,वसंतराव मोरे ,ऋषिकेश खांदे ,विजय डेंगळे आदी उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हार भगवतीपूर महाशिवरात्री महोत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय रविंद्र मोरे ,अक्षय वादे ,आदित्य चव्हाण ,मंगेश वादे, दिनेश राकेचा ,कौशल दळवी ,युवराज जँगम, आयुष मोरे ,यश जोशी , वैभव कोळपकर ,सुजीत खळदकर ,गणेश गोसावी ,आशुतोष बोरसे,विकी डंक आदी प्रयत्नशील होते यावेळी महाशिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा सत्कार करण्यात आला महाशिवरात्री उत्सव समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या दिवशी विविध स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री महस्के यांनी केले तर आभार अक्षय मोरे यांनी मानले.
Post a Comment