कोल्हार प्रतिनिधी : ( गणेश कुंभकर्ण )
डाळींब शेती करताना पाणी व्यवस्थापण करणे गरजेचे आहे तसेच डाळींब शेती करताना रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करावा व शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास डाळींब शेती फायद्याची आहे असे मत डाळींबरत्न बाबासाहेब गोरे यांनी व्यक्त केले
खांदे पाटील अग्रो तर्फे आयोजित ‘डाळिंब आंबेबहार व्यव्स्थापण’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गोरे बोलत होते .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रभान खर्डे हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर भगवती देवालय ट्रस्टचे विश्वस्त नंदकुमार खांदे , श्रीकांत खर्डे ,भगवतीपूरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे ,माजी अभियंता सुभाष फरगडे ,न्युट्रीमेक्स कंपनीचे लोंढे ,मेग्नेशिया कंपनीचे सुपे ,कन्सल्टंट सचिन चिंधे आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाला अनेक शेतकर्यांनी सहभाग नोंदविला.डाळींब रत्न बाबासाहेब गोरे यांनी डाळिंब पिकाचे व्यवस्थापन करावे तसेच डाळींब पिकाची कशी काळजी घ्यावी तसेच पीक व्यवस्थापनावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विविध औषधांचे उपयोग डाळींबरत्न बाबासाहेब गोरे यांनी सांगितले
या कार्याक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी डाळींब रत्न बाबासाहेब गोरे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार खांदे पाटील अग्रोच्या वतिने करण्यात आला कार्यक्रमानंतर शेतकर्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डाळींब रत्न बाबासाहेब गोरे यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खांदे पाटील अग्रोचे संचालक हर्षल खांदे यांनी केले आभार आब्रे सर यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार साईप्रसाद कुंभकर्ण यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश खांदे ,नितीन खांदे ,संजय खांदे ,अनिल खांदे ,सुन खांदे, विशाल खांदे यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment