कोल्हार :- ( साईप्रसाद कुंभकर्ण ) 
 आर्थिक परिस्थितीने खालावलेल्या समाज बांधवांच्या कुटुंबास अडचणीच्या प्रसंगी काहीतरी मदत तिच्या रूपाने उपयोगी पडावे या विचाराने प्रेरित होऊन श्री मनोहर भांडेकर ,अकोट यांनी लावलेले रोपटे आज बघता बघता याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे . 2018 मध्ये काही समाज बांधव "एक हात मदतीचा " या व्यासपीठावर एकत्रित आले या माध्यमातून समाजातील संकटग्रस्त कुटुंबाला त्या कुटूंबावर कोसळलेल्या आपत्तीतून सावरण्यासाठी साहाय्य करावे असे सर्वांचे मत ठरले एखाद्या बांधवावर अकस्मात आलेल्या नैसर्गिक आपत्ती किंवा आजारपण इत्यादी अडचणीच्या प्रसंगी त्या कुटुंबाचे पाठीशी ही टीम उभे राहून त्यातून सावरण्यासाठी समाज बांधवांना मदतीचे आवाहन करून समाजाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचा ही टीम प्रयत्न करते. सुरुवातीस फेब्रुवारी 2018 ते 12 सप्टेंबर 2020 या तीन वर्षाच्या कालावधीत एकूण 9 पीडित कुटुंबास आर्थिक साहाय्य मिळवून या टीमने मिळवून दिले तसेच मुख्यत्वेकरून समाजातील आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या घटकास गंभीर ,संकटसमयी आर्थिक मदत केली आहे आणि भविष्यातही ही टीम विविध उपक्रम राबवणार असून आर्थिक दुर्बल व गरजवंत घटकासाठी ही टीम भविष्यात विविध माध्यमातून काम करणार आहे. या टीममध्ये सुनील आंदुरे सर ,अरुण पांडे ,राजेंद्र कोळकर ,प्रमोद शिनगारे ,विलास वानरे,श्याम पोफळे प्रशांत भांडेकर ,स्वप्निल घडामोडे, राहुल रेडके ,विशाल पांढरकर, सुनील शीलवंत ,लक्ष्मण कासार इत्यादी समाजबांधव यात कार्यरत आहेत. या टीमच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post