कोल्हार वार्ताहर (गणेश कुंभकर्ण)-
भारतामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची मुहूर्तमेढ ही महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रोवली.सद्य परिस्थितीत महाविद्यालयामधील कला,वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून झालेले आधुनिक बदल हे स्विकारावे लागतील.त्यासाठी या शाखांचा अभ्यास नाविन्यपूर्णतेने आणि सखोलपणे विद्यार्थ्यांपुढे ठेवावा लागेल.असे मत अमेरिकेतील सॅलिस्बरी विद्यापीठाचे प्रा.डॉ. प्रवीण सप्तर्षी
यांनी व्यक्त केले.
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हार (ता.राहाता) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.१०)
"रिसेंन्ट अँडव्हासेन्स इन ह्युमैनिटीज़ कॉमर्स अँन्ड सायन्स"विषयावर एक दिवशीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न झाला.यावेळी प्रा.डॉ. सप्तर्षी यांनी हे मत व्यक्त केले.
आँनलाईन व आँफलाईन अशा पध्दतीने संपन्न झालेल्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक दत्ता पाटील शिरसाठ होते . तर नायजेरिया येथील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ एग्रीकल्चर मधील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.बाबा लोला,आयोडील स्यमुअल आणि कोल सिटी युनिव्हर्सिटीचे प्रा. मॅथेमॅटिक्स आणि कम्प्युटर सायन्स विभागप्रमुख आणि आयसीटी संचालक प्रा.मायकेल ओनिमाएड हे आँनलाईन या परिसंवादात सहभागी झाले होते.
विविध देशातून तसेच वेगवेगळ्या राज्यांतील महाविद्यालयातून ३१६ प्राध्यापकांनी या परिसंवादात आपले शोधनिबंध सादर केले.तर ऑनलाईन प्रणालीद्वारे देशभरातील सुमारे ४०० पेक्षा अधिक जणांनी यात सहभाग नोंदविला. प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी या परिसंवादाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्या डॉ.प्रतिभा कानवडे यांनी परिषद आयोजनची भूमिका विषद केली. उपप्राचार्य डाँ. चंद्रकांत रुद्राक्ष यांनी परिसंवादात सहभागी झालेल्याचा परिचय करून दिला. आभार प्रा. उत्तम येवले यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा. सौ.संगीता धिमते यांनी केले. परिसंवाद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. समन्वयक, विभाग प्रमुख,प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment