कोल्हार : ( साईप्रसाद कुंभकर्ण )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा 12 आँगस्ट 2021 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेचा अंतिम निकाल व राज्य गुणवत्ता यादी 7 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आला.त्यात रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोल्हार बु. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत उज्वल यश संपादन केले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी या परीक्षेसाठी ३ विद्यार्थी पात्र झाले व २ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी मधील २९ विद्यार्थी बसले होते पैकी १७ पात्र झाले व शिष्यवृत्तीधारक १३ असे एकूण १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सौ. फुलारी आर. एस. व श्रीमती शिंदे पी. एल. तसेच श्रीमती. पुंड ए. एन श्री. फुलारी एस.ई. श्री धनवडे बी.आर.श्री. नागटीळक एस.के,श्री.पिदूरकर एन.आर. श्रीम.लहामगे ए. एस.
प्राचार्य श्री.कापडणीस के.एस. उपप्राचार्य श्री.कोकाटे पी. एल. पर्यवेक्षक श्री.पावसे एम.टी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अरुण कडू पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अँड.सुरेंद्र पा. खर्डे ,अशोक शेठ आसावा,नंदू मामा खर्डे ., बि. के.खर्डे ., पांडुरंग देवकर ,विभागीय अधिकारी मा. श्री कन्हेरकर टी. पी., सहाय्यक विभागीय अधिकारी मा. श्री वाळूंजकर के. एन., मा. श्री तापकिर एस. डी.तसेच सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
Post a Comment