कोल्हार प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण
भाजपच्या ओ बी सी युवा मोर्चाच्या वतीने घरकुलाच्या ड यादीच्या संदर्भात राहुरीचे पंचायत समितीचे बी डी ओ गोविंद खामकर साहेब यांना नुकतेच निवेदन देण्यात आले या निवेदानात म्हटले आहे की,राहुरी तालुक्यातील सर्व गावातील घरकुलांच्या "ड" यादीचा सद्यस्थितीला शासनामार्फत सर्वे सुरू असुन ग्रामपंचायतीनी ग्रामसभेच्या मंजुरीने घरकुलांच्या ड यादीचा प्रस्ताव दिला होता पंरतु मागिल सर्वे करताना ज्या पोर्टलवर सर्वे केला ती साईट ताञिंक कारणाने बंद झाल्याने पुर्ण यादीचा सर्वे झाला नाही.काहींचा सर्वे होऊनही तो अपलोड झाला नाही म्हणून ग्रामपंचायातीने अनेक गरजुवंत नागरिकाचे नावे देऊनही सध्या आलेल्या यादीत सदर तांत्रिक अडचणीमुळे बरीच नावे आलेली नसल्यामुळे अनेक गरजुवंत लाभार्थी लाभापासुन वंचित राहतील तरी या सर्वे होत असणार्या यादीत वगळलेल्या नागरिकांचे नावे समाविष्ट करून घ्यावे.अन्यथा भविष्यात गावपातळीवर काम करणाऱ्या सरपंच उपसरपंच,सदस्य यांच्यावर संबधित गावकर्यांचा रोष वाढत जाऊन गावोगावी वाद वाढू शकतात.सदर नावे कमी झालेले नावे हे ऑनलाईन प्रणालीच्या तांत्रिक अडचणीने झाले असून यात संबधित ग्रामपंचायत ग्रामस्थ अथवा पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही तरी आपण आपल्या अधिकारात याबाबत पाठपुरावा करून घरकुलापासून कोणीही गरजुवंत वंचित राहू नये.याबाबत प्रयत्न करावा. वगळलेले नावे आताच्या सर्वे होत असलेल्या यादीत समाविष्ट करून घ्यावे अन्यथा तालुक्यातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी खासदार सुजयदादा विखे पाटील, मा आमदार शिवाजी कर्डिले मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,अशोक गाढे व तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ओबीसी युवा मोर्चा मोठे आंदोलन उभारील. निवेदनावर भाजपाचे ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंञे,चिटणिस बिपीन ताठे,सरपंच अनिल अनाप, साञळ चे सरपंच सतिष ताठे,संदीप अनाप, ऋषीकेश अनाप यांच्या सह्या आहेत.
Post a Comment