कोल्हार प्रतिनिधी - साईप्रसाद कुंभकर्ण
रामपूर येथील श्री. स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सोहळा अनेक भाविक भक्त आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त केंद्रामध्ये दि.12/12/2021 ते 18/12/2021 या सात दिवसांत श्री गुरु चरित्र पारायनाचे आयोजन करण्यात आले होते
या सोहळ्यात महिलांनी उत्स्फूर्तपणें सहभाग घेतला सप्ताहात 50 भाविक भक्त पारायनार्थी होते दत्तजयंती च्या दिवशी सत्यनारायण महापूजा व गोपालकाल्याने या उत्सवाची सांगता झाली. हिंदू धर्म व संस्कार टिकवून ठेवण्यासाठी दिंडोरी प्रणित गुरुमाऊलींच्या उपदेशानुसार मराठी अस्मिता जागृत राहावी म्हणून परिश्रमपूर्वक महिलांनी कष्ट घेवुन बारा महिन्यांचे सण व उत्सव कसे साजरे केले जातात त्याचे प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी रामपूर केंद्राचे संपर्क प्रमुख श्री अमोल पठारे यांनी केंद्रामध्ये नियमीत सूरू असलेल्या बालसंस्कार केंद्र व इतर उपक्रमांची माहिती दिली व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सेवेकरी श्री अंत्रे सर तसेच व स्वेताताई दिघे यांनी केंद्रामार्फत राबवित असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
ग्रामस्थांतर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा.अनिल लोखंडे सरांनी उपस्थित मान्यवर पाहुणे व ग्रामस्थ सेवेकरी यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाची सांगता महाआरती करून व महाप्रसाद घेवुन करण्यात आली. याप्रसंगी अनेक भाविक भक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते , सेवेकरी श्री अमोल पठारे, श्री रावसाहेब तनपुरे , उल्हास तनपुरे भाऊसाहेब नालकर , मनोज सरोदे , तुषार तनपुरे , पप् चिकणे , राहुल नालकर , पोपट तनपुरे , धनंजय पठारे आदींनी विशेष परिश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वी केला.
Post a Comment