कोल्हार प्रतिनिधी- ( साईप्रसाद कुंभकर्ण )
राहुरी येथील डोखे परिवारातील ज्येष्ठ स्व.पुंजा मामा डोखे यांच्या दशक्रियाविधी निमीत्त स्मशानभूमीच्या नियोजीत आवारात व परिसरात वृक्षारोपण करून सामाजिक बांधीलकी जपत एक आगळा वेगळा नवीन उपक्रम करून एक आदर्श समाजापुढे ठेवला.
याप्रसंगी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य प्रमुख संघटक , प्रा.अनिल लोखंडे यांच्या संकल्पणेतून वृक्षारोपण करण्याचा विचार मांडला तो विचार श्री.गंगाधर डोखे , श्री बाजीराव डोखे यांनी व परिवाराने प्रत्यक्षात अमलात आणला, "आधी केले मग सांगितले" या उक्तीप्रमाणे जवळ पास 50 वृक्षांचे , वड , लिंब , सप्तपदी , करंजी इत्यादी तीन ते साडेतीन फूट उंचीचे वृक्षांचे वृक्षारोपण केले व तो विचार सत्यात उतरवला.यावेळी श्री गंगाधर डोखे , श्री बाजीराव डोखे , राज्य आदर्श शिक्षक अनिल लोखंडे सर , रामपूरचे उपसरपंच श्री राहुल पाटील साबळे , रामपूर सोसायटी चेअरमन श्री ज्ञानदेव पाटील लोखंडे या मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले , यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराचे श्री किशोर लोखंडे , विजय लोखंडे , राजेंद्र खळदकर , संतोष अनाप , रमेश डोखे , नंदू लोखंडे , राहुल डोखे , अमोल डोखे आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment