कोल्हार (वार्ताहर ) : साईप्रसाद कुंभकर्ण 

 कोल्हार भगवतीपुर येथील भीमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने कोल्हार येथील गौतम नगर मध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संविधान उद्देशिका चे वाचन या यावेळी करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी संविधाना विषयी आपले मनोगत व्यक्त केले रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व उपस्थित अतिथी यांचा यावेळी भीमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण लोखंडे यांनी केले यावेळी कोल्हार बुद्रुक च्या महिला सरपंच निवेदिता बोरुडे कॉम्रेड सुरेश पानसरे, श्याम गोसावी ,राजन ब्राह्मणे ,सुनील बोरुडे लवलेश लोखंडे ,संदीप लोखंडे, प्रसन्ना लोखंडे ,श्याम लोखंडे ,धनंजय लोखंडे आदीसह भीमशक्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post