कोल्हार बु.प्रतिनिधी - (साईप्रसाद कुंभकर्ण)
कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीने दोन लाख रुपये खर्चून गावातील सहा ठिकाणी महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन बसवले त्यामुळे महिला मुलींना येथे केवळ एक रुपया मध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार आहेत या मशीनच्या शुभारंभप्रसंगी कोल्हार बुद्रुक चे माजी सरपंच अॅड.सुरेंद्र खर्डे विद्यमान सरपंच निवेदिता बोरुडे ,गोरक्ष खर्डे ,तबाजी लोखंडे ,श्रीकांत बेंद्रे ,ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे आदी उपस्थित होते.
हे सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय ,गावठानातील अंगणवाडी ,अंबिका नगर येथील अंगणवाडी,रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल ,प्रवरा हायस्कूल ,हाउसिंग सोसायटीतील अंगणवाडी या सहा ठिकाणी बसविण्यात आले आहेत 15 वा वित्त आयोग 2020- 21 अंतर्गत दोन लाख रुपये खर्चून हे मशीन्स बसवण्यात आले आहेत.
Post a Comment