कोल्हार प्रतिनिधी :
(साईप्रसाद कुंभकर्ण )
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १५७ हून अधिक विद्यार्थ्यांची इन्फोसिस, कॅपजेमिनी, अक्सेन्चर व कॉग्निजेंट या व या सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली. त्यांनी यावेळी नमूद केले कि महाविद्यालयाच्या विद्यार्थांची उत्र्कृष्ट पगारावर नोकरी साठी निवड होत आहे. महाविद्यालयाच्या ऋतुजा दिघे या विद्यार्थिनीची क्रेडीट सुईस्से या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बारा (१२ LPA) लाखांच्या पगारावर निवड झाली आहे.
या वेळी खासकरून पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले व सर्वाना यशस्वी करिअरच्या शुभेछ्या दिल्या. तसेच या विद्यार्थांचा श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच उद्दिष्ट ठेवून महाविद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सतत तत्पर आहेत. विद्यार्थ्यांना सातत्याने जगातील नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंट उपलब्ध करून दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रवरा संस्था ही विद्यार्थी आणि पालकांच्या पसंतीस नेहमीच पात्र ठरत आहे. प्रवरा मधून आज हजारो विद्यार्थी जगातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्टार्ट अप व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध केले आहेत.
ग्रामीण भागातही प्रवरेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी तयार होतात व प्रवरेचे नाव उज्ज्वल करतात. प्रवरेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मागे नाही याचा मला अभिमान वाटतो असे मत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
या वेळी प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने म्हणाले कि कोविड-१९ च्या परीस्थिती मधेही सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात १५७ हून अधिक विद्यार्थांची प्लेसमेंट झालेली असून व अनेक विद्यार्थी कंपन्यांमध्ये शॉर्टलिस्टेड आहेत. प्रवरा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आता 'गुणवत्ता' हाच एकमेव निकष राहणार असल्याने प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुस्तकी ज्ञानाला व्यावहारीक ज्ञान आणि अनुभवाची जोड देतानाच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमातून नोकरीक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याच्या प्रयत्नामुळे अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे इन्फोसिस, असेंचर, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, टाटा कम्युनिकेशन, इटोन इंडिया ली., मित्सुबिशी इलेकट्रीकल्स, टाटा मोटर्स अँड जनरल इलेक्ट्रिकल्स, टीआयएए ग्लोबल बिझनेस सर्विसेस, टेरेसिड इंडिया प्रा. ली., टोयो इंजिनीरिंग ली. लुपिन फार्मसिटीकल्स, प्राज इंडस्ट्रीज ली. घरडे केमिकल्स, लार्सन अँड ट्युब्रो, बी. एस. ए. कॉर्पोरेशन, व्हेरॉक इंजिनीरिंग, ह्योसुंग इंडिया प्रा. ली., कोरम क्रोमवेल इंडिया प्रा. ली., डेल्टा फिनोकेम, हर्मन फिनोकेम, कॅटफार्मा, जॉन डियर, मिंडा रिंडर इंडिया प्रा. ली. अटॉस सिंटेल, बकार्ड कॉम्प्रेशन इंडिया प्रा. ली. पियाजो व्हेईकल, हिंदुस्थान युनिलिव्हर, व्हर्च्यूसो , टाटा मोटर्स, इंडिया ऑइल कॉर्पोरेशन, एव्हर इलेक्ट्रॉनिक्स, आय. सी. आय. सी. आय., एच. डि. एफ. सी., फोर्ब्स माशेल, नेट प्रोटेक्टर, लॉजीपूल प्रा. ली., टाटा टेलीसर्विसेस, के प्लास्ट, धूत ट्रान्समिशन, यश इलेक्ट्रॉनिक्स प्रा. ली., सॅमकोन ऑटोमेशन, श्री पाल्मि पॉलिमर्स प्रा. ली. साई इन्फोकॉर्प, तिरुमला ऑटोमेशन, वर्चुसो प्रोजेक्ट्स अँड इंजिनीरिंग लिमिटेड पुणे, आय- ब्रेन डिसीजन सॉफ्टवेअर प्रा.ली., इपिटोम कंपोनंट्स लिमिटेड, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लिमिटेड, नैन्को एग्झिम प्रायव्हेट लिमिटेड, एव्हरइलेक्ट्रॉनिक्स अश्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या सर्व कंपन्यांमधील मनुष्यबळ अधिकार्यांनी विद्यार्थांच्या उत्तम सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या कंपन्या नावीन्यपूर्ण आणि आधुनिक डिजिटल सेवा देणारया व कन्सल्टन्सी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून ५० पेक्षा जास्त देशातील ग्राहकांना चार दशकांहून अधिक अनुभवासह सेवा देण्यास तत्पर आहे. तसेच कुशल मनुष्यबळावर सतत प्रशिक्षण देऊन डिजिटल कौशल्य वृद्धिंगत करण्यास या कंपन्या तयार असतात . तसेच या कंपन्या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या असून आर्टीफिसिअल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, क्लाऊड काम्प्युटिंग या मुख्य प्रवाहात काम करणारी कंपनी आहे. या सर्व कंपन्या महाविद्यालयास दरवर्षी कॅम्पस इंटरव्हासाठी सर्व विभागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असतात.
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हामधील प्रशिक्षण वर्ग कोविड-१९ मुळे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जातात. करियर डेवलपमेंट सेलची टीम कंपनीच्या मानव संशोधन व विकास विभागाशी सतत संपर्कात राहून आगामी कालखंडात कोणत्या तंत्रज्ञानाची गरज असणार आहे याची माहिती करून घेतात. त्यानुसार नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी सराव, चर्चासत्र, इंटरव्हाची तयारी करून घेतली जाते. या कंपन्यांमध्ये माजी विद्यार्थी उच्च पदावर काम करत असल्याने विद्यार्थांना त्यांचे मार्गदर्शन सतत मिळत असून प्लेसमेंटमध्ये त्याचा फायदा होत आहे.
ह्या विद्यार्थांनी या यशाचे श्रेय प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असणाऱ्या उपक्रमाना व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला दिले.
या विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हापरिषदेच्या अध्यक्षा नाम. सौ. शालिनीताई विखे पाटील ,खासदार सुजयदादा विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननिय डॉ. शिवानंद हिरेमठ , सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, ट्रेनिंग प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. मनोज परजणे, डॉ. अण्णासाहेब वराडे, डॉ. सचिन कोरडे सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.
Post a Comment