कोल्हार प्रतिनिधी :
(साईप्रसाद कुंभकर्ण )
सिप्ला फाउंडेशन कुरकुंभ ( दौंड) यांच्यावतीने कै.पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील शिक्षण संस्थेच्या प्रवरा तंत्रनिकेतन महाविद्यालयास प्रयोगशाळा उपकरणे भेट देण्यात आली
त्या प्रसंगी सिपला प्रायव्हेट लिमिटेड चे अधिकारी श्रीयुत संतोष तांबे तसेच गणेश तांबे ,प्रवरा तंत्रनिकेतनचे प्राध्यापक निंबाळकर सर व
सदर प्रयोगशाळेला उपकरणे देण्यासाठी सिपला फाउंडेशनचे विकास शिंदे,शशी सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश तांबे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने ही उपकरणे लवकर उपलब्ध झाली असून या उपकरणांचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
संस्थेच्या वतीने प्राचार्य विजय राठी यांनी सिपला फाउंडेशनचे विशेष आभार मानले आहे.
Post a Comment