कोल्हार (वार्ताहर )-
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द व परिसरात रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्यालाआलेल्या पुराचे पाणी रात्री कोल्हार खुर्द येथील महावितरण च्या सब स्टेशनच्या आवारात व कार्यालयात शिरल्याने अधिकारी व कर्मचारी यांचे चांगलेच हाल झाले अशा परिस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले व कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कता ठेवली तीन हॉर्सपॉवर सच्या वीज पंपाच्या साह्याने सतत पाच तासाच्या अथक प्रयत्ना नंतर हे पाणी बाहेर काढून देण्यात कर्मचार्यांना यश आले .दरवर्षी सबस्टेशन पाण्यात जाण्याचा घटना घडत असताना व कोल्हारखुर्द ग्रामपंचायतीला या समस्येबाबत वारंवार पत्र देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याची माहिती महावितरणचेकनिष्ठ अभियंता दिलीप गाढे यांनी दिली. रविवारी सबस्टेशन पाण्यात गेल्यावर अभियंता गाढे यांनी कोल्हार खु. ग्रामपंचायतीला फोनकरूनकळवले त्यांनी सोमवारी सकाळी जेसीबी आणून तात्पुरती कार्यवाही केली परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी एकमुखी मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. जेणेकरून भविष्यात मोठी दुर्घटना घडणार नाही.
कोल्हार खुर्द येथील महावितरण च्या सबस्टेशन मध्ये ओढ्याचे पाणी शिरले.
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment