कोल्हार प्रतिनिधी-(साईप्रसाद कुंभकर्ण) 
 कोल्हार गावात जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधाचा फेरविचार करवा आशी मागणी खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कोव्हीड संकटाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे.यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये पुन्हा दि.४ ऑक्टोंबर पासून ते १३ ऑक्टोंबर पर्यत निर्बंध लागू केल्याने व्यवसाय सुरू ठेवण्यात वेळेची घालून देण्यात आलेल्या बंधनामुळे व्यापाऱ्यांसमोर पेच निर्माण झाल्याने ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. राहाता तालुक्यातील सात गावांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध अन्यायकारक असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली.कोल्हार भगवतीपूर गावाची लोकसंख्या ४० हजार इतकी आहे.कोल्हार येथील व्यापारीपेठ शेतकरी नागरीक यांना सोयीची असून, बाजारपेठ बंद राहील्यास मोठे अर्थिक नूकसान होणार असल्याची बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. कोल्हार आणि परीसरातील २० हजार गावांचे लसीकरण पूर्ण झाले असून आढळून येणारे रुग्णही ठराविक भागातच आहे.परीसराचा वाढता विस्तार पाहाता कमी रुग्ण संख्येमुळे गावच बंद ठेवणे योग्य नसल्याचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना स्पष्ट केले. प्रशासनाने १० रुग्णांची अट ठेवून लावलेले निर्बंध करणे मोठ्या लोकसंख्येच्या गावांवर अन्याय करणारे असल्याने मोठ्या गावांना एक हजार लोकसंख्येमागे एक रुग्ण प्रमाण ठरवून त्याप्रमाणे गावातील निर्बंध लावण्याचा विचार व्हावा आशी मागणी या शिष्टमंडळाने केली. कोल्हार आणि भगवतीपूर येथील बाजारपेठेत सर्वच छोट्या मोठ्या दुकानदारांनी कर्ज काढून आपले व्यवसाय सुरू केले आहेत.मागील दोन वर्षाचे अर्थिक संकट पाहाता आता पुन्हा व्यवसाय बंद ठेवले गेल्यास काढलेल्या कर्जाचा मोठा भार व्यावसायिकांना सोसावा लागेल त्यामुळे प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधाचा फेरविचार व्हावा आशी मागणी शिष्टमंडळाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post