कोल्हार : ( साईप्रसाद कुंभकर्ण )
भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याची कार्यकारणी आज भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली...
यावेळी राहाता तालुका कार्यकारणीसाठी आदरणीय आमदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच खासदार आदरणीय डॉ. श्री सुजय दादा विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष श्री योगेश अण्णा टिळेकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस श्री नंदकुमार जेजुरकर जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेबजी गाडेकर ओबीसी मोर्चा प्रभारी श्री अशोक भाऊ पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यकारणीत तालुक्यातील प्रत्येक भागातील समाज घटकांना संधी देऊन भाजपा पक्ष संघटना सक्षम करणे हा उद्देश समोर ठेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यकारणीत जवाबदारी देण्यात आली आहे.
सदर प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात युवा ओबीसी मोर्चा तालुका प्रमुखपदी श्री जितेंद्र लक्ष्मण माळवदे, दाढ यांची तर तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी श्री साईप्रसाद कुंभकर्ण व महाजन यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी श्री जिल्हाध्यक्ष राजूभाऊ गोंदकर, उपाध्यक्ष श्री अशोक भाऊ पवार, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष श्री स्वानंद रासने यांच्या हस्ते शॉल व नियुक्तीपत्र देऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी उत्तर भारतीय आघाडी संयोजक श्री राजेंद्रजी शर्मा व वैभव शिंदे उपस्थित होते.
सदर कार्यकारणीसाठी शिर्डी शहराचे नगराध्यक्ष श्री शिवाजीभाऊ गोंदकर, श्री नितीन भाऊ कापसे, श्री सचिन भाऊ शिंदे, श्री किरणजी बोऱ्हाडे, श्री योगेशजी गोंदकर, श्री सुनिलजी लोंढे श्री सचिन भैरवकर यांचे सहकार्य लाभले.
भाजपा ओबीसी मोर्चा पक्ष संघटनेत अनेक इच्छुकांना भविष्यात संधी देण्यात येणार असून जवबादारी दिलेल्या उर्वरित सर्वांना
ओबीसी समाज्याचा तालुका मेळाव्यात आदरणीय आमदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व खासदार आदरणीय डॉ. श्री सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते दिले जाणार आहे.
Post a Comment